नुकतीच नवी दिल्ली येथे तिसरी 'सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि गुप्तचर विषयावरील राष्ट्रीय परिषद (National Conference on Cyber Security, Digital Forensics & Intelligence - NCCDFI)' २०२६ परिषद संपन्न झाली असून यामध्ये 'CyberVitals' आणि 'Netअन्वेषक' (Net Anveshak) या डिजिटल ॲप्लिकेशन्सचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत असलेल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (National Institute of Electronics & Information Technology - NIELIT)' मार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
- 'सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि गुप्तचर विषयावरील राष्ट्रीय परिषद (National Conference on Cyber Security, Digital Forensics & Intelligence - NCCDFI)' २०२६ ची ही तिसरी आवृत्ती होती.
- १६ ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीदरम्यान नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ही पार पडली.
- परिषदेची संकल्पना / थीम (Theme): 'सायबर सुरक्षित भारत: भारताचे डिजिटल भविष्य बळकट करणे (Cyber Secure Bharat: Fortifying India’s Digital Future)' ही या परिषदेची संकल्पना होती.